बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

डिजिटल क्रांतीचा शिलेदार धुळे जिल्हा


         ➤ चला हाेऊया तंत्रस्नेही, करूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र  ➤

मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब (मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या मनातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवीण्याच्या दृष्टीने मा.ना.श्री. विनोदजी तावडे साहेब (शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा.श्री नंदकुमार साहेब (प्रधान सचिव, शालेय शिक्षण, विभाग, महाराष्ट्र राज्य )यांच्या अथक प्रयत्नातून सम्पूर्ण महाराष्ट्र अतिजलदगतीने प्रगत हाेण्याच्या दृष्टिने घाैडदाेड करीत आहे यात मा.श्री. धीरज कुमार साहेब (आयुक्त शिक्षण) व मा.श्री. गाेविंद नांदेडे साहेब (संचालक, प्राथमिक, पूणे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा रथ हा वाड्या, वस्ती, गाव, शहरे व महानगरात सर्व शाळा प्रगत करण्यासाठी सर्व स्तरावर अभूतपूर्व रित्या पोहचत आहे, आज जिल्हा स्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी, व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक, यांची मेहनत दिसू लागली आहे यात तालुकास्तरावर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत तथा डायट येथे सेवार्थ सर्व साधनव्यक्ती बंधू भगिनी यांची या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत महत्वपूर्ण भूमिका आहे सर्व साधनव्यक्ती शिक्षण परिषद, मुख्याध्यापक सहविचार सभा किंवा शिक्षकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व विद्यार्थी मध्ये जाऊन आपले काैशल्य पणाला लावून अध्यापन करतात, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जर खर्या अर्थाने यशस्वी हाेतांना दिसत आसेल तर त्यात मोठी भूमिका शिक्षकांची आहे  परिणामी सर्व शाळा  ज्ञानरचनावादी, ABL शाळा, डिजिटल शाळा, हाेऊ लागल्या आहेत सर्व शिक्षकांना मानाचा सलाम! 
यात उल्लेखनीय योगदान आज प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत डिजिटलीकरण करण्या साठी धुळे जिल्हा अग्रेसर आहे! 

➲ डिजिटल क्रांतीचा शिलेदार धुळे जिल्हा ➲

➨ मा.श्री. ओमप्रकाशजी देशमुख साहेब  (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे)  यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हयातील सर्व शाळा प्रगत करण्यासाठी व डिजीटल करण्याची एक क्रांतिकारक माेहिम शुरू झाली आहे, मा. देशमुख साहेब वारंवार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम चा आढावा घेऊन वेळोवेळी दिशा दर्शक मार्गदर्शन करतात, या माेहिम चे सारथी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे व शिक्षण विभाग, प्राथमिक हे आहेत! 
➨ मा. डॉ विद्या पाटील मैडम(  प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे) यांनी लाेकवर्गणी साठी "प्रेरणा सभा" गावाेगावी शुरू केल्यात सकाळी ७ वाजता असाे किंवा रात्री ८ वाजता प्रेरणा सभेचे वारे सम्पूर्ण धुळे जिल्हयातील सर्व गावात वाहू लागलीत लाेकांच्या मनात शाळेबद्दलची आस्था व गाेडी निर्माण करण्यासाठी ह्या  प्रेरणा सभेची भूमिका फार माेठी आहे प्रेरणा सभेच्या खर्या सारथी मा. डॉ विद्या पाटील मैडम ह्याच आहेत.
➨ मा. श्री. माेहनजी देसले साहेब 
(शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे) 
आज संपुर्ण महाराष्ट्रात डिजिटल शाळा क्रांतीचे अग्रगण्य शिलेदार व डिजिटलीकरण चे जनक म्हणजे श्री माेहनजी देसले साहेब, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तयार करत असतांना तीला तंत्रज्ञानाची जाेडद्यावी या पुरोगामी व नाविन्यपूर्ण विचार मनात घेवून देसले साहेब कामाला लागले डिजिटलीकरण करणे हे काम येवढे साेपे नव्हते कारण निम्मा जिल्हा आदिवासी बहुल क्षेत्रोंचा गरीबी वाड्या वस्त्याची माेठी संख्या ह्या सर्व बाजू समस्या निर्माण करणारे परंतु समस्या पाहून थांबणारें मधले देसले साहेब नाहीत उलट कठीण परिस्थिति चांगले काम करण्याची उर्मी त्यांच्याच ठासून भरली आहे त्याच उर्मीच्या जाेरावर आज महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा हाेण्याच्या अगदी जवळ धुळे जिल्हा आहे यात माेठे श्रेय मा. श्री. माेहनजी देसले साहेब यांचे आहे. 
➨ मा. श्री. हर्षल विभांडीक सर 
(साफ्टवेयर इंजिनियर, अमेरिका) 
मंजू गुप्ता फाऊंडेशन च्या साेबतीने मा. श्री. हर्षल विभांडीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्हयात डिजिटल शाळा कशा तयार कराव्यात व लाेकवर्गणी व सामाजिक संस्थाची मदत या मार्गाने डिजिटलीकरण करण्या साठी सुरूवात झाली यासाठी मार्गदर्शन शिबीर व केंद्र प्रमुख यांच्या मदतीने बीटस्तरीय कार्यशाळा घेवून सर्व स्तरावर प्रेरणा देण्याचे काम हर्षल विभांडीक सर यांनी केले 
➨ सर्व गट शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख 
शिंदखेडा, धुळे, शिरपूर, साक्री, येथील सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्या प्रेाहत्साहन घेवून सर्व शिक्षक जाेमाने कामाला लागलेत व लाेकवर्गणी च्या माध्यमातून लाखों रूपये गाेळा झाले व सर्व शाळा सुसज्य व बाह्यरूपी रंग देवून सुंदर झाल्यात 
➨ साधनव्यक्ती ची भूमिका 
सर्व साधनव्यक्ती बंधू भगिनी यांनी स्थानिक पातळीवर शिक्षक व पालक यांच्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत गुणवत्ता विकास करण्यासाठी मार्गदर्शन केले व ई सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले 
➨ शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्या साठी प्रशिक्षण 
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे येथे धुळे जिल्हयातील सर्व डिजिटल शाळेच्या किमान एक शिक्षकास तंत्रज्ञानाचा वापर करून कसे डिजीटल शाळेत अध्यापन करावे या साठी बहुमाेल असे मार्गदर्शन पर प्रशिक्षण घेण्यात आले होते या प्रशिक्षणाचे खरे सुत्रधार जिल्ह्यातील तंत्रस्नेही साधनव्यक्ती श्री मनाेहर पांडुरंग वाघ हे हाेते त्या दाेन दिवसाचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दिले. 
या गतीने आज आम्ही डिजिटल क्रांतीचे शिलेदार हाऊ पाहताेय मग "चला हाेऊया तंत्रस्नेही,घडवू प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" 

       ✍ लेखन व संकलन
 श्री. मनाेहर पांडुरंग वाघ, साधनव्यक्ती 
गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे महाराष्ट्र 
➽ 9763236070

 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा