रविवार, १० डिसेंबर, २०१७

राज्यस्तरीय विषय साधनव्यक्ती कार्यशाळा अमरावती येथे उत्साहात संपन्न

विषय साधनव्यक्ती यांची एक दिवशीय कार्यशाळा 


*आनंदसाठी काम करा मा नंदकुमार साहेब(प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग)यांचे विषय साधनव्यक्ती यांच्या "राज्यस्तरीय शिक्षण परीषदमध्ये" मौलिक प्रतिपादन.*
*विषय साधनव्यक्ती प्रदेश महासंघ म.रा*
__________व्दारा_________
             
*विषय साधनव्यक्ती यांची एक दिवशीय कार्यशाळा*
*(दिनांकः-१०.१२.२०१७)*
*स्थळः-संगीत सुर्य केशवराव भोसले सभागृह अमरावती.*

*उद्दघाटकः-मा नंदकुमार साहेब.*
*अध्यक्षः-मा डाॅ.सुनिल मगर साहेब.*
*प्रमुख अतिथीः-मा किरण कुलकर्णी साहेब मु का अ अमरावती,मा सिद्धेस वाडकर सर शिक्षण सल्लागार,मा आंबेकर सर प्राचार्य DIECPD अमरावती,मा.रत्नमाला खडगे मॅडम प्राचार्य DIECPD वर्धा.मा शाम मक्रमपुरे सर सहा.कार्यक्रम अधिकारी व इतर मान्यवर मंडळी.*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
संकलन/उपस्थित/मनोगत✍
*चांगदेव सोरते साधनव्यक्ती भामरागड*
------------------------------------------
*प्रथमतः वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,वंदनिय राष्ट्रसंत गाडगे महाराज,डाॅ.शिवाजीराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
लगेच मान्यवरांचा स्वागत समारंभा घेण्यात आला. लागलीच कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री प्रकाश आंबेकर सर सचिव प्रदेश महासंघ यांनी केले.
_________________________
*मा डाॅ सुनिल मगर साहेब यांचे मार्गदर्शन.*
*मुलांच्या क्षमता ओळखुन काम करा.
*मुलांची वाचन क्षमता विकसीत करणे आवश्यक आहे.
*वाचन क्षमता विकास कार्यक्रमाचा लाभ घेऊन शाळा स्तरावर त्याचा प्रत्यक्ष वापर व्हावा.
*गुणवत्ता विकासात विषय साधनव्यक्ती यांची भुमिका महत्वाची आहे.
*साधनव्यक्तीना आपले काम दाखविण्याची उत्तम संधी लाभली आहे.
*प्रत्येक मुलाला समजुन घेऊन त्या नुसार नियोजन करावे.
*यश येत नसेल तेव्हा आपली अध्यापन पद्धती बदलुन योग्य सहाय्य करा.
________________________
*मा किरण कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शन*
*समाजाच्या आवश्यक गरजानुसार शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे.शिक्षणातूनच पुर्ण करता येईल.हे शक्य आहे.
*मा.नंदकुमार साहेब आपल्याला लाभल्यापासुन शिक्षणात,राज्यात शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे.
________________________

*आपले प्रेरणा मा.नंदकुमार साहेब यांचे मार्गदर्शन*

*साधनव्यक्तीच्या निर्मिती पासुन सर्वात मोठा कार्यक्रम.याचा मला आनंद होत आहे.
*विषय साधनव्यक्तींनी आनंदासाठीच कार्य करावेत.
*मुल हे मानवाचे मुल आहे,बोललेले त्याला कळतो,ते कळण्यासाठी उत्तम सहयोग करा.
*प्रथम आपण मानव आहोत,त्यामुळे माणुसकीसाठी १००% वेळ देणे आवश्यक आहे.
*आपला वापर मुलांसाठी व समाजासाठी करा.
*माझ्यामुळे ईतरांच्या आयुष्यात काय घडते?याचा विचार करून कार्य होणे आवश्यक आहे.
*तालुक्यातील शाळांची,सर्व विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उत्तमातील उत्तम प्रयत्न आवश्यक आहेत.
*मी नित्य आनंदी कसा राहीन?यासाठी प्रयत्न करावेत,सोबतच मुल शिकत नसेल तर ते दुःख आहे.दूःख संपवायला शिकले पाहिजे.
*राज्यातील सर्व मुलांना वाचन येणे अत्यावश्यक आहे.अपयश आले की आनंद होऊच शकत नाही.
*विद्यार्थी न शिकणे हा त्याच्या भविष्यातील त्रास आहे.
*राज्याचे स्वप्न आंतरराष्ट्रीय शाळा साकार करणे आहे.सर्वांच्या उत्तम कार्याने शक्य आहे.
*सर्व मुलांची मुलभुत वाचन संस्कृती विकसीत करून मुलांना सन्मान द्या.
*गरजेनुसार भाषा शिका,मेळघाट,भामरागड व इतर ठिकाणी विविध भाषा बोलल्या जातात,तेथील स्थितीनुसार कार्य केले पाहीजे.
*८ जून-२०१७ च्या शासन निर्णयानुसार परीणामासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. वापर परीणामासाठीच केल्या जावा.
      सिंगापुर,हाँगकांग,जपान,हे देश आशिया खंडातील असुन पुढे आहेत.आपणही आशिया खंडात असुन मागे का?साहेबांनी विविध प्रकारचे उदाहरणे देऊन अतिषय मार्मिक मार्गदर्शन करीत विषय साधनव्यक्तींकडुन अधिक उत्तम कामाची आशा ठेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
*कार्यशाळेचे सुत्रसंलालन श्री राजेश नाईक,श्री चेतन गायकवाड,श्री अरून पालवे यांनी केले तर आभार विवेक राऊत यांनी मानले.तंत्रज्ञान सहाय्य श्री मनोहर वाघ यांनी काम पाहिले.राज्यभरातुन १७०० विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.राज्यातील सर्व विषय साधनव्यक्तीं यांनी परमेश्वर काकडे यांच्या नेतृत्वात,अमरावती टिमच्या सहकार्यानी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व.जिल्ह्यांनी सहयोग दिले.*

*✍संदेश - आपली उपयोगीता हेच आपले मूल्य आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा