शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

जिल्हा परिषद शाळा जामन्यापाडा(खैर.)ची शैक्षणिक सहल संपन्न


* जि प शाळा जामन्यापाडा(खैर), चिखलीपाडा ,कुंडीपाड  यांच सयुक्तिक विद्यमाने शैक्षणिक सहल संपन्न* 



*स्थळ: जामन्यापाडा(खैर) ते घृष्णेश्वर, वेरूळ लेणी, भद्रमारोती,दौलताबाद*
*आयोजक*
*जि. प.शाळा जामन्यापाडा(खैर)*
*जि प शाळा चिखलीपाडा*
*जि.प.शाळा कुंडीपाडा(खैर)*
केंद्र *पळासनेर* ता. शिरपूर जि धुळे
===============================
*उपक्रम* विद्यार्थी चे सप्तगुणाचा विकास व विचाराना चालना देणे.तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत नाविन्यपूर्ण उपक्रम
 
14/12/2017रोजी *माझी शाळा माझा उपक्रम*व शाळा एक उपक्रम अनेक अंतर्गत *शैक्षणिक सहल* नाविण्य पूर्ण उपक्रम *घृष्णेश्वर ,भद्रमारोती, वेरूळ लेणी ,दैलताबाद* येथे राबविण्यात आला.जि प शाळा जामण्यापाडा (खैर) .जि प शाळा चिखलीपाडा, जि प शाळा कुंडीपाड,यांच्या  सहकार्याने *शालेय विद्यार्थ्यांना शिस्त व निसर्ग प्रेमाचे धडे देत. नाविन्य पूर्ण उपक्रम आयोजित केला.
____________________________________________
*उत्सुकता* शैक्षणिक सहली बाबत मुलांची एवढी उत्सुकता होती की, आम्ही शिकवत असताना ,परिपाठात रोजच मुले उत्सकतेने विचारणा करत होते की, "सर सहल कधी जाणार ?? काय काय पाहायला मिळेल आम्हाला?? किल्ले कसे असतात?? लेणी म्हणजे काय ??", अश्या स्वरूपाचे प्रश्न करत होते...
*सहलीचा प्रवास* सहलीच्या दिवशी एखाद्या शहरातील नामकीत शाळेतील मुलांना शाळेत सोडायला सर्व पालक उपस्थित असतात त्याच प्रमाणे मुलाचे आई वडील  सहलीचा दिवशी पालक उपस्थित होते.... सहलीच्या दिवशी मुलेंच काय गावतील सर्च पालक व गावकरी जागे होते. अस वाटत होतं की जस आज गावात एखादा मोठा सण साजरा  केला जात आहे. प्रवास *जामन्यापाडा*(खैर) येथून सुरवात झली
*मनोगत मुलांचे* ," सर खूप मजा आली ... मी पहिल्यांदा बस मध्ये बसलो... एवढ्या लांब आमचे आई बाबा घेऊन जात नाही"..... असे बोलके वाक्य बोलत होते आणि प्रत्येक वेळेस नवं नवीन प्रश्न विचारत होते.
*घृष्णेश्वर* प्रथम आमची सहल ही "करुणा के स्वामी" शिवशंकर चा बारावा अवतार 'घृष्णेश्वर' येथे पोहचली. मंदिरा बाबत सर्व इतिहास , महत्व निर्माण , या बाबी सांगितले
*दौलताबाद* त्या नंतर आमची सहल दौलताबाद या ऐतिहासिक किल्ल्या कडे वडली,या ऐतिहासीक वास्तूची माहिती माझे सहकारी *श्री सखाराम गावळे* सरांनी प्रत्येक धरोहर ची विद्यार्थ्यांना समजेल असे सांगत होते...... तसेच किल्ला वर " वानर सेनाना"(माकड) पाहून आमचे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले व त्यांचा नकला करत होते.....व किल्ला चड उतर करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता....तेथून परत आम्ही भद्रमारोती मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मुलांनी आणलेला जेवणाचं डब्बा मनसोक्त खाल्ला ...व सहलीचा मुख्य स्थळा कडे वढलो
*वेरूळ* सहलीचा शेवटचं स्थळ म्हणजे वेरूळ लेणी होय. मुले किल्ला चढउतार करून दमले होते... पण लेणी पाहताच आचार्य चकित झाले होते व त्यांचा थकवा तेव्हाच निघून गेला .पुन्हा नव्या दमाने  मुले लेणी पाहण्यात गुंग झाले... लेणी म्हणजे काय ??? याच उत्तर मुलांना मिळालं होतं ... लेणी विषयीची पूर्ण माहिती मी (*कैलास पावरा*) सांगितले
विद्यार्थी च्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झालेलं पाहून आम्हाला ही समाधान वाटलं. ...
आम्ही शाळेत बसवलेली सगळी गाणी बस मध्ये बसून पूर्ण रस्त्यात म्हणून घेतले ..... मुले ही गाणी आवडीने म्हणत होते .नक्कला वगैरे प्रकारांना ऊत येई पर्यंत मजा केली. आमच्या शिक्षकांच्या नक्कला त्यांच्याचसमोर करण्याची ही एकमेव संधी आम्हाला मिळाली. आणि गाणी गाऊन  सगळ्यांची पुरेवाट झाली...   परतीचा प्रवास  सहलीची आठवणी घेऊन सुरु झाला ..... *विशेष म्हणजे* आमच्या सोबत आमचे अधिकारी वर्ग ही मुलांन मध्ये बसून गाण्याचे अंताक्षरी खेळत होते
- लेखन -
*कैलास पावरा*
जि. प.शाळा जामण्यापाडा(खैर)
*प्रचार व प्रसिद्धी *
श्री. मनोहर वाघ सर,शिरपूर

                                                               ******* सहलीचे क्षणचित्रे ************












२ टिप्पण्या: