आज दिनांक १८/०२/२०१७ राेजी शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम अभयारण्य क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा चिंचपाणी विशेष म्हणजे झोपडीतील या शाळेच्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन धुळे जिल्हयातील तंत्रस्नेही साधनव्यक्ती श्री मनाेहर पांडुरंग वाघ सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले ह्या प्रसंगी तरडी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
या वेळी श्री मनाेहर वाघ सर यांनी शाळेच्या दाेघे शिक्षकांचे मनापासून काैतूक केले व विद्यार्थी साठी १० तास चालू शकतील येवढ्या शैक्षणिक व्हिडीओ, बालगीत, गाेष्टी,गडकिल्ले ची माहिती देणारा व्हिडीओ संग्रह चा पेन ड्राइव शाळेस दिला, तसेच श्री सचिन जडिये, साधनव्यक्ती यांनी उपस्थितीतांना शैक्षणिक माहिती दिली,
या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पल्लवी काेळी व श्री रेवसिंग पावरा या दाेघे शिक्षकांनी ह्या झोपडीतील शाळेस एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अध्यायवत शाळेचे रूप देतांना ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीने उत्कृष्ट साहित्याचा वापर कसा करावा या बाबत विविध साहित्य तयार करून शाळेत ठेवली आहेत, या शाळेच्या शिक्षकांना बिट शिक्षण विस्तार अधिकारी श्री गवळी साहेब व केंद्र प्रमुख श्री गाडीलाेहार यांचे मार्गदर्शन लाभले आहे,
आज धुळे जिल्हा डिजिटल क्रांतीचा शिलेदार हाऊ पाहताेय मग झोपडीतील शाळा कशा मागे राहतील, "मग चला हाेऊया तंत्रस्नेही, करूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र"
⚫ शब्दांकन :- श्री सचिन जडिये, साधनव्यक्ती
👉 प्रचार व प्रसिद्धी
श्री मनाेहर पांडुरंग वाघ, तंत्रस्नेही, साधनव्यक्ती
गट साधन केंद्र, पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे
📱9763236070
UPDATES
शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७
" झोपडीतील शाळेत वाहू लागलेत डिजिटल चे वारे "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा